Small screen imageLarge screen image
Small screen imageLarge screen image
Small screen imageLarge screen image
Photo by bharatrath
' विना सहकार नाही उद्धार ' याच उक्ती ला अनुसरून अधिकाधिक शेतकरी वर्गाने एकत्र यावे आणि सहकाराचा विस्तार करावा, त्याच योग्य प्रकारे बळकटीकरण करावे यासाठी फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे
Photo by bharatrath
समन्वयामुळे शेतकऱ्यांमध्ये माहिती, तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम शेती पद्धतींची देवाणघेवाण सुलभ होते, त्यांना एकमेकांकडून शिकण्यास, नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्यास आणि सामान्य आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवते
Photo by bharatrath
नव्या युगाची कास धरून शेतकऱ्यांमध्ये कृषी मालाच्या संदर्भात जागरूकता निर्माण करणे ,त्यांना अर्थसाक्षर करणे , योग्य ते व्यवस्थापकीय कौशल्य अंगीकारून समृद्धी आणि स्वयंविकास साधने हा विचार सुद्धा मैत्री विचारांची फाउंडेशन चा पाया आहे.

संस्थेचं ध्येय

शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबीयांना सर्व दृष्टीने सक्षम करणे


कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना आधुनिक जगातील नवकल्पना आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित व शिक्षित करणे .

Photo by bharatrath

समूहाची व्यापकता

8+
राज्य

4000+
शेतकरी
600+
एकूण प्रोग्राम

34+
उपक्रम

मार्गदर्शन कार्यक्रम

सेंद्रिय शेती

शेती करताना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठा जसे की पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र ,गांडूळ खात व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी यावर मार्गदर्शन आणि चर्चा केली जाते.

हवामान

सर्वात मोठा हवामान बदलाचा परिणाम शेतीक्षेत्रावर होत आहे या बदलांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानविषयक जागरूकता करून शेतीत होणारे नुकसान टाळून उत्पादनातील सातत्य कायम राखण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित विषयातील तज्ञ यावर सखोल मार्गदर्शन करतात.

जीवनप्रवास

विशेष सत्रामध्ये विविध शेतकऱ्यांचे जीवनप्रवास सांगितले जातात. त्यांना आलेल्या समस्या, त्यांतून त्यांनी कशा प्रकारे मार्ग काढला आणि प्रगती केली यावर सांगितले जाते. या मार्गदर्शनामुळे नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते आणि शेती करण्याची नवीन उमेद निर्माण होते.

आध्यात्मिक

शेतीला आध्यात्माची जोड याप्रमाणे समूहामार्फत फक्त शेतीविषयक मार्गदर्शन न करता आध्यात्मिक मार्गदर्शन देखील केले जाते. यामध्ये प्रवचन, पारायण, कीर्तन, ग्रंथ वाचन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सर्वसाधारण चर्चा

सदर विशेष चर्चा हि खुली असते. शेतकरी यात आपले अनुभव, त्यांना पडणारे प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाते. यामध्ये शेतकरी आपले मत मांडू शकतो, तसेच त्याला जे वाटेल ते बोलू शकतो. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होतो.

महिला जीवनप्रवास

समूहात शेतकरी महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतीत नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास कथन आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे व्यवस्थापन संपूर्णपणे शेतकरी महिलांच्या हाती दिले जाते. महिलांना एक हक्काचं व्यासपीठ देणे हा उद्देश आहे.

प्रेरणादायी व्याख्यान

शेतकरी वर्ग हा शेती करत असताना विविध समस्या त्याला भेडसावत असतात.अनेक दैनंदिन अडचणींना त्याला सामोरे जावे लागते . अनेकदा आपण पाहतो की शेतकरी वर्ग हताश झालेला आपण पाहतो . अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येसारखा पाऊल सुद्धा उचलताना दिसतात . याच्यासाठी म्हणून प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली जातात आणि शेतकर्यांच्या मनावरील ताण-तणाव कमी होण्यात मदत होते.

जमीन आरोग्य

अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर करतो. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत गेलं. जमिनीचा पोत बिघडत गेला आणि तिची सुपीकता कमी झाली. यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी याविषयी शास्रज्ञानचे मार्गदर्शन घेतले जाते.

पीक तंत्रज्ञान

विज्ञानाच्या प्रगतीमुळे कृषी क्षेत्रात आज मोठे बदल पाहायला मिळत आहेत . याचा फायदा सर्वच शेतकरी वर्गाला व्हायला हवा तरच आपण कृषी क्षेत्राची सर्वांगीण प्रगती झाली असे म्हणू शकतो .विविध पिकांमध्ये आलेले नवनवीन तंत्रज्ञान, त्याचे फायदे, वापर आणि महत्व याविषयी संबंधित तज्ञ व्यक्ति च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.

शेती व्यवसाय

प्रत्येकाने शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहायला पाहिजे आजच्या काळाची ती गरज आहे . व्यावसायिक शेती आणि आपली पारंपरिक शेती पद्धती याच मोठा बदल काळानुरूप झाला आहे आणि जगाच्या सोबत पुढे जायचे असेल तर शेतीच अर्थशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे . खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद जुळला पाहिजेत तरच आपण यशस्वी व्यावसायिक शेतकरी म्हणून पुढे जाऊ शकतो.
लाच अनुसरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यांना शेतीचे महत्व, त्यातून होणारे फायदे हे सर्व समजावून सांगितले जाते.

कीड नियंत्रण

पिकांवर पडणाऱ्या विविध किडी ओळखणे व तिचे मोजमाप करणे, कीड नियंत्रणाचे प्रकार, जैविक कीड नियंत्रणाचे महत्व, जैविक कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके, जैविक कीटकनाशके कसे तयार करावे अशा विविध विषयांवर तज्ञाचे मार्गदर्शन केले जाते.

पशुपालन

भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन किंवा पशु पालन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लाखो शेतकऱ्यांना उत्पन्न आणि उपजीविकेचे महत्त्वपूर्ण स्त्रोत प्रदान करते. यामध्ये गुरे, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि बरेच काही यांसारख्या पशुधनांचे प्रजनन, संगोपन आणि व्यवस्थापन समाविष्ट आहे. पशुपालनाची प्रथा भारताच्या ग्रामीण संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दूसरा पर्याय म्हणून पशुपालन यावर मार्गदर्शन केले जाते.

आरोग्य

'आरोग्यम धनसंपदा ' आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते पण शेतकरी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात म्हणून शेतकरी वर्गाने स्वतःची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना आरोग्यविषयक माहिती दिली जाते. शेतकरी सशक्त तरच तो उत्तम प्रकारे शेती करू शकेल आणि चांगल्या दर्जाचा माल पिकवू शकेल .

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान

शेती हा जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा पाया आहे . शिवाय वाढत्या अन्नाच्या मागणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या नवीन पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. उत्पादनापासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर करीत काटेकोर नियोजन केल्यास शेतीमालांचे नुकसान कमी करणे शक्‍य होईल. तसेच शेतात येणाऱ्या विविध समस्यांवर पर्याय म्हणून तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक आहे. यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

रोजगार

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाच्या पुढे जाऊन करिअर विषयक , रोजगारांच्या संधीविषयक खूपच कमी माहिती असते . माध्यमांच्या अभावी अशा रोजगाराच्या संधी वाया जाऊन नयेत आणि त्यांना जगभरातील नाविन्यपूर्ण माहिती मिळावी या करितां हि मैत्री विचारांची फाऊंडेशन च्या वतीने विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात .

Photo by bharatrath

ही मैत्री विचारांची फाउंडेशन - एक आधार

ही मैत्री विचारांची फाऊंडेशन सातत्याने महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे . व्यवस्थेनं आणि परिस्थितीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध माध्यमातून संस्थेनं मोठा आधार दिला आहे मग तो मानसिक असो किंवा आर्थिक स्वरूपातील असोत . महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फाऊंडेशन ने केलं आहे . हा मोठा सामाजिक बदल हि मैत्री विचारांची फाऊंडेशन माध्यमातून मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात होत आहे .

ही मैत्री विचारांची - शेती क्षेत्रातील बदलाचा समूह

देशभरातील शेतकरी एकत्र येऊन 'ही मैत्री विचारांची' या समूहाची मुहूर्तमेढ

शेतकरी हीच धर्म व जात मानून एकोप्याने काम करणारा शेतकरी समूह

सोशल मीडियाच्या क्लबहाऊस या ऑडिओ ॲपवर शेती विषयक २४ तास चर्चा

शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम

अनेक समूह आणि पुरस्कार विजेते शेतकरी यांचा समूहात समावेश

भविष्यातील गरजा ओळखून नाविन्यपूर्ण काम करण्याचा समूहाचा प्रयत्न

step

सरपंचाची शेतीवाडी

शेतीविषयक माहिती, मार्गदर्शन आणि ‘ही मैत्री विचारांची’ या समूहाबद्दल अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी ‘सरपंचाची शेतीवाडी’ हा युट्यूब चॅनेल नक्की पहा

© 2025 HMV Foundation. All Rights Reserved.